सांगलीत दीड टन वजनाचा रेडा, किंमत ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
सांगली | सध्या सांगलीमध्ये एका रेड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील तासगावमध्ये भरविण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये हा रेडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.कारण, या रेड्याचं वजन 1.5 टन असून त्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या रेड्याचे नाव 'गजेंद्र' असून त्याची किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे.
सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा "गजेंद्र" नावाचा रेडा. या रेड्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी प्रदर्शनात चांगलीच गर्दी केली होती.
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील मंगसुळी गावातील विलास नाईक यांचा हा 'गजेंद्र' रेडा आहे. या 'गजेंद्र'चा रोजचा खुराक म्हणजे त्याला दिवसाला 15 लिटर दूध, बक्कळ ऊस, गवत आणि इतर खाद्य लागते.नाईक यांच्या घरच्या गीर म्हशींचा हा रेडा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी हजारो किलोमीटरवरून लोकं येतात. सध्या सांगलीच्या तासगाव येथे शिवार प्रदर्शनात हा 'गजेंद्र' रेडा आला असून खास आकर्षण ठरला आहे. या गजेंद्रला तब्बल 80 लाखाला मागणी सुद्धा आली होती. पण, मालकांनी 'गजेंद्र'ला विकले नाही. आत्तापर्यंत कर्नाटकसह चार प्रदर्शनात 'गजेंद्र'ने सहभाग घेतला आहे.