नागपूरच्या सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू

नागपूरच्या सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू

नागपूरच्या बाजार गावातील कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत हा स्फोट झाला आहे.

नागपूर : नागपूरच्या बाजार गावातील कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत हा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 महिला 3 पुरुषांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

नागपूरच्या सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू
Manoj Jarange: आंतरवाली सराटीत आज मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक

माहितीनुसार, नागपूरच्या बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट झाला. यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला. अद्यापही अनेकजण कंपनीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी आमदार अनिल देशमुख उपस्थित आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन मृतकांना श्रध्दांजली वाहिली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे.

नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com