पुणे जिल्ह्यात झिकाचे 9 नवे रुग्ण आढळले; जिल्ह्यात झिका रुग्णांची संख्या पोहोचली 44 वर

पुणे जिल्ह्यात झिकाचे 9 नवे रुग्ण आढळले; जिल्ह्यात झिका रुग्णांची संख्या पोहोचली 44 वर

पुणे जिल्ह्यात झिकाचे 9 नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे जिल्ह्यात झिकाचे 9 नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळत आहे. पुणे जिल्ह्यात झिका रुग्णांची संख्या आता 44 वर पोहोचली आहे. पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. पुण्यात जवळपास अकरा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत झिकाचा संसर्ग झाला आहे.

जिल्ह्यातील झिकाची संख्या ही 44 झाली असून यात दहा वर्षाच्या बालकापासून ७० वर्षांवरील ज्येष्ठांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. 12 गरोदर महिलांना देखील झिकाची लागण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com