99th Marathi Sahitya Sammelan : 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( 99th Marathi Sahitya Sammelan) 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून सुरूवात झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संमेलनाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचं उद्घाटन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झालं. त्यानंतर राजवाड्यापासून ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. आज 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आहे.
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होत आहे.
Summary
साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित
सकाळी 11 वाजता होणार उद्घाटन
