पुणे हिट अँड रन प्रकरण; विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ

पुणे हिट अँड रन प्रकरणात विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सुशांत डुंबरे, पिंपरी चिंचवड

पुणे हिट अँड रन प्रकरणात विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. हिंजवडी पोलिसात विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन येथील ज्ञानसी ब्रम्हा सोसायटीने हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.

सोसायटीत ठरलेल्या सुविधा, मोकळी जागा, कंव्हीन्स डिड लेटर अद्याप दिलं नसून रीकन्स्ट्रक्शनसाठी सोसायटी साठी परवानगी घेतली नाही. 2010 साली पजेशन देऊन ही विशाल ने पुढची पूर्तता केलेली नाही. या प्रकरणी आता गुन्हा दाखल केला गेला असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com