Nilesh Ghaiwal
Nilesh Ghaiwal

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खोलात; कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

मोबाईल दुकानदाराला धमकावत घेतले सिम कार्ड
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खोलात

  • कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

  • मोबाईल दुकानदाराला धमकावत घेतले सिम कार्ड

(Nilesh Ghaiwal) गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खोलात असल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश घायवळवर कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मोबाईल शॉपी चालकाला धमकावून बळजबरीने त्याच्या नावावर सिम कॉर्ड घेऊन त्या नंबर वरून विविध बँकांच्या अकाउंट सुरू करून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. डहाणूकर भागात ही घटना 2020 मध्ये घडली होती.

मात्र निलेश घायवळने जीवे मारण्याची धमकी दिल्याने तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. तक्रारदराने आता फिर्याद दिली त्यानुसार कोथरूड पोलिसांनी आयपीसी 420,506,504, 66सी आयटी कायदा आणि 42 भारतीय दूरसंचार कायदा 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com