26/11प्रमाणे हल्ल्याचा कट? 17 अतिरेकी मुंबईत येणार, पोलिसांना फोन

26/11प्रमाणे हल्ल्याचा कट? 17 अतिरेकी मुंबईत येणार, पोलिसांना फोन

मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचं सावट निर्माण झाले आहे. मुंबईत 17 अतिरेकी येत असल्याचा फोन आला आहे.
Published on

मुंबई : मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचं सावट निर्माण झाले आहे. मुंबईत 17 अतिरेकी येत असल्याचा फोन आला आहे. यामुळे संपूर्ण मुंबईची आणि देशाची झोप उडाली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून मुंबईतली महत्त्वाच्या भागांत सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

26/11प्रमाणे हल्ल्याचा कट? 17 अतिरेकी मुंबईत येणार, पोलिसांना फोन
संतोष बांगरांची मंत्रालयाच्या गेटवर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ? म्हणाले...

मुंबई पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा फोन असून हाजीअली येथे १७ अतिरेकी येणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. यामुळे माहिती मिळताच पोलीस अलर्ट झाली असून हाजीअली परिसर पिंजून काढला आहे. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. पोलिसांनी त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता तो बंद येत होता. तपासाअंती अज्ञाताचा फोन अफवा असल्याचं निष्पन्न झाले आहे. संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले असून पोलीस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहे

26/11प्रमाणे हल्ल्याचा कट? 17 अतिरेकी मुंबईत येणार, पोलिसांना फोन
अब्दुल सत्तारांची आमच्याकडे सर्व रेकॉर्डिंग; दानवेंचा गर्भित इशारा

दरम्यान, याआधीही अनेक वेळा मुंबई पोलिसांना अनेक दहशतवादी हल्ल्याचे निनावी फोन आले आहेत. ऐन दिवाळीत मुंबईत 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा धमकीचा मेसेज मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला आला होता. पोलीस कंट्रोल रूमला पाकिस्तानातून व्हॉट्सअप मेसेज आल्याची माहिती मिळाली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com