corona
coronaTeam Lokshahi

चिंता वाढली! रुग्ण दुपटीच्या कालावधीत मोठी घट

corona virus : रुग्णवाढीने चौथ्या लाटेचे स्पष्ट संकेत

मुंबई : मुंबईत कोरोना विषाणू (Corona Virus) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्ण दुपटीच्या कालावधीत मोठी घट होत आहे. गेल्या १८ दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी ३,५६१ दिवसांवरून थेट ५६१ दिवसांवर आला आहे. त्यामुळे कोरोनाची सध्याची रुग्णवाढ चौथ्या लाटेचे (Fourth Wave) स्पष्ट संकेत देत आहे.

corona
भागवत कराडांच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न; पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण

मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या यशस्वी लढ्यामुळे तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करण्यात यश आले. मात्र, एप्रिल २०२२ मध्ये कोरोनाची तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्या थेट ३५ पर्यंत खाली आली होती. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुंबईची चिंता वाढली आहे.

सद्यस्थितीत दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांवर नोंद होत असल्याने कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत असतानाच कानपूर 'आयआयटी'ने जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानुसारच सध्या रुग्णवाढ होत असल्याने मुंबईत खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

corona
मुख्यमंत्र्यांनी निधी नाही किमान वेळ द्यावा; देवेंद्र भुयार यांचा चिमटा

राज्यात कोरोनाचे २ हजार ९४६ नवे रुग्ण

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून रविवारी सुमारे २ हजार ९४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत सर्वाधिक १८०३ रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे नवीन रुग्ण आढळत असताना १४३२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. सर्वाधिक रुग्ण महानगरपालिकांच्या हद्दीत आढळून येत आहेत.

corona
Covid19 मुळे प्रकृती खालावली; सोनिया गांधी रुग्णालयात भरती
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com