निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेत मोठा बदल

निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. पोस्टल मतांची मोजणी लगेच होणार नसल्याची माहिती मिळत आहे. पोस्टल मतांच्या निकालाशिवाय ईव्हिएममधील मतांची मोजणी होणार आहे.

पोस्टल मतांची मोजणी ईव्हिएमच्या पहिल्या राऊंड सोबत होणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून दुपारी 12.30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com