Ulhasnagar : ऐन निवडणुकीच्या तोंडावर रिपाई आठवले गटात मोठी दुफळी; रिपाईच्या जिल्हाध्यक्षांनी रामदास आठवले यांना चुकीची माहिती देत विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप
(Ulhasnagar) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
यातच आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर रिपाई आठवले गटात मोठी दुफळी निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. रिपाई जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शिवसेना शिंदे गटाने आपल्याला सात जागा सोडल्याची चुकीची माहिती दिल्याचा गंभीर आरोप आठवले गटाच्या नेत्यांनी केलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आठवले गटात अंतर्गत दुफळी निर्माण झाल्याने चर्चा रंगली आहे.
Summary
ऐन निवडणुकीच्या तोंडावर रिपाई आठवले गटात मोठी दुफळी
रिपाईच्या जिल्हाध्यक्षांनी रामदास आठवले यांना चुकीची माहिती देत विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप
स्वतःच्याच पक्षातील नेत्यांचा जिल्हाध्यक्षांवर आरोप
