सोलापूरमधील एमआयडीसी परिसरातील टेक्सटाईल कंपनीला भीषण आग

सोलापूरमधील एमआयडीसी परिसरातील टेक्सटाईल कंपनीला भीषण आग

सोलापुरमधील अक्कलकोट एमआयडीसी येथील प्रिसिजन कंपनीजवळ असलेल्या अन्नपूर्णा टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सोलापुरमधील अक्कलकोट एमआयडीसी येथील प्रिसिजन कंपनीजवळ असलेल्या अन्नपूर्णा टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली आहे. आग लागलेल्या घटनास्थळी सोलापूर अग्निशामक दल दाखल झाला असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

तेथे मोठ्या प्रमाणात कारखान्याचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण काय ते अद्याप अजूनही स्पष्ट झालेले नाही. कारखान्याला लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com