हदयद्रावक! पोटमाळा पडून दीड महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

हदयद्रावक! पोटमाळा पडून दीड महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

मान्सून उशिराने का होईना राज्यात दाखल झाला असून सर्वत्रच पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे नागरिक सुखावले असले तरी अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडत आहेत

मुंबई : मान्सून उशिराने का होईना राज्यात दाखल झाला असून सर्वत्रच पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे नागरिक सुखावले असले तरी अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडत आहेत. अशीच एक हद्यद्रावक घटना मुंबईतील दहीसरमध्ये घडली आहे. घरातील पोटमाळा पडून दीड महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आङे.

हदयद्रावक! पोटमाळा पडून दीड महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू
2024मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार की नाही? फडणवीस म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगर गल्ली क्रमांक १३ मध्ये ही घटना घडली आहे. घराचा पोटमाळा हा लाकडापासून बनवलेला होता आणि तो पावसामुळे भिजून खराब झाला होता. या पोटमाळ्यावर काही मुलं खेळत होती. तर तिथेच दीड महिन्याची चिमुकली झोपली होती आणि ही मुलं खेळत असताना अचानक पोटमाळ्याचा काही भाग खाली कोसळला. यात त्या दीड महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान, बाकीची मुलं किरकोळ जखमी झाली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com