crime
crimeTeam Lokshahi

फुकटात बियर न दिल्याने रिक्षाचालकाची शॉप चालकाला मारहाण

बदलापूरच्या माणकिवली परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद
Published on

मुंबई : फुकटात बियर न दिल्याने एका रिक्षाचालकाने बिअर शॉप चालकाला मारहाण केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. माणकीवली परिसरात घडलेली ही घटना घडली असून सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
उमेश कोल्हे हत्या प्रकरण; गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार - शंभुराज देसाई

बदलापूरच्या माणकीवली परिसरात दीपक मोतीरामानी यांचं विजय बियर शॉप आहे. या दुकानात मंगळवारी दुपारी संजय पेलके हा रिक्षाचालक बियर घेण्यासाठी आला. त्याने दुकानदाराकडे बियर मागितल्या. मात्र, बियर घेत असतानाच आपल्याकडे पैसे नसल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे दुकानदाराने त्याच्याकडून बियर परत घेतल्या. याचा राग आल्यामुळे रिक्षाचालक संजय पेलके याने बिअर शॉप चालक दीपक मोतीरामानी याला मारहाण केली. तसंच त्याच्या दुकानावर दगडफेक सुद्धा केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com