दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

राज्यभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा विराजमान झाले. परंतु, आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत आहे.
Published on

विकास मिरांगे | मुंबई : राज्यभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा विराजमान झाले. परंतु, आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत आहे. काल आलेला गणपती आज जात आहे म्हणून अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर, अशी घोषणा देताना लहान मुलांसह मोठेही गलबलून जात आहेत.

दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
घरी जा, स्वयंपाक करा; चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपवर घणाघात, ही भाजपची मानसिकता

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. त्याशिवाय, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्थांनीदेखील कृत्रिम तलावाद्वारे विसर्जनाची तयारी केली आहे. मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.

गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहू समुद्र किनाऱ्यांसह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com