रायगड जिल्ह्यातील आदिवासियांना वनविभागाची अनोखी दिवाळी भेट
आदिवासीयांचे स्थलांतरण रोखण्यासाठी आणि वनीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी रायगड जिल्ह्यातील आदिवासियांना शाश्वत रोजगार देण्याची घोषणा अलिबाग उपवनसंरक्षक राहुल पाटिल यांनी केली आहे. सुधागड जिल्ह्यातील या आदिवासियांसोबत दिवाळी साजरी करत येण दिवाळीमध्ये ही घोषणा करत उपवनसंरक्षक राहुल पाटिल यांनी या आदिवासियांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे.
सुधागड तालुक्यातील समुदायिक वनहक्क मान्यता प्राप्त चिवे ग्रामपंचायत हद्दीतील जांभुळपाडा आदिवासी वाडी तसेच नाडसूर ग्रामपंचायत हद्दीतील ठाणाले आदिवासी वाडीतील आदिवासियांना कोणत्याही रोजगाराच्या संधी नसल्याने पावसाळा वगळता पुढील महिने रोजगारासाठी स्थलांतरण करावे लागते.या आदिवासियांना आपल्याच ग्रामपंचायत भागात रोजगार मिळाला तर या आदिवासी समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.यासाठी रोजगार हमी योजने अंर्तगत वन विभागाकडून या आदिवासी समुदायाला रोजगार मिळून देण्यासाठी उप वनसंरक्षक राहुल पाटिल यांनी तयारी दर्शवली आहे.या आदिवासी समाजातील १५० कुटुंबांना मार्च अखेरपर्यंत रोजगार मिळणार आहे.या आदिवासी समाजातील कुटुंबीयांशी बांधिलकी जपत उपवनसंरक्षक राहुल पाटिल यांनी त्यांच्या टीम ने या आदिवासीयांची दिवाळी गोड केली आहे.वन विभागाकडून या आदिवासी कुटुंबीयांना दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले.जंगलात आदिवास करणाऱ्या या समाजामुळे जंगल रक्षणाचा वसा जपण्यासही वन विभागाला मोठा हातभार लागेल,या समाजाला रोजगार देत आर्थिक,शैक्षणिक सबळ बनविले तर हा समाज स्पर्धेच्या युगात टिकेल असा विश्वास उप वनसंरक्षक पाटिल यांनी व्यक्त केला आहे.