Aaditya Thackeray : मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश; काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, पूर्ण अध्यादेश वाचून वक्तव्य करेन. मराठा समाजाची एकी महत्वाची होती ती पाहायला मिळाली. ही जर ताकद एकत्र आली तर अजून काय होऊ शकते. तरीही पूर्ण अध्यादेश वाचून मी वक्तव्य करेन. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com