अब्दुल सत्तारांची पुन्हा जीभ घसरली; संतापलेलं सत्तार म्हणाले...

अब्दुल सत्तारांची पुन्हा जीभ घसरली; संतापलेलं सत्तार म्हणाले...

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली.

त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. अब्दुल सत्तार यांनी माईक हातात घेऊन कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे. असे सत्तार म्हणाले.

तसेच मतदारसंघातील नागरिकांनी गोंधळ घातला आणि यावर मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले यावेळी हाडे तुटेपर्यंत यांच्यावर लाठी चार्ज करा असे पोलिसांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदेश दिले. तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा असाच पिक्चर पाहता का असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com