Abu Azmi : 'मी अल्लाचा बंदा आहे, नाही म्हणणार वंदे मातरम्'; भिवंडीतल्या कार्यक्रमात अबू आझमी पुन्हा बरळले
थोडक्यात
- भिवंडीत अबू आझमी पुन्हा बरळले 
- 'मी अल्लाचा बंदा आहे, वंदे मातरम् बोलणार नाही' 
- 'खुदा सोडून इतरांची वंदना करणं मान्य नाही' 
(Abu Azmi ) अबू आझमी यांनी 1995 पासून सुरू केलेल्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रवास तीस वर्ष झाल्यानिमित्त भिवंडीतील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थानी एकत्र येऊन स्थापन केलेल्या भिवंडी फर्स्ट च्या नेतृत्वाखाली भिवंडीत अबू असीम आझमी यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकारी ,राजकीय पक्षांचे पदाधिकारी माजी नगरसेवक यांनी हजेरी लावली होती. यावेळी अबू आझमी म्हणाले की, 'मी अल्लाचा बंदा आहे, वंदे मातरम् बोलणार नाही''खुदा सोडून इतरांची वंदना करणं मान्य नाही' असे अबू आझमी म्हणाले. अबू आझमींच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.

