Western Railway वर 20 जूनपासून धावणार एसी लोकलच्या 40 फेऱ्या, पाहा वेळापत्रक

Western Railway वर 20 जूनपासून धावणार एसी लोकलच्या 40 फेऱ्या, पाहा वेळापत्रक

मे महिन्यात रेल्वेकडून सिंगल राईडसाठी एसी लोकलच्या दरात 50% कपात जाहीर करण्यात आली आणि नंतर हळूहळू एसी लोकलला प्रतिसाद वाढला आहे.

सुमेध साळवे | मुंबई : मुंबईकरांचा एसी लोकलला (AC Local) वाढता प्रतिसाद पाहता पश्चिम रेल्वेने (Western Railway Line) एसी लोकलच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 जून 2022 पासून पश्चिम रेल्वे मार्गावर 8 नव्या एसी लोकल सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता या मार्गावरील लोकलची संख्या 32 वरून 40 करण्यात आली आहे.

Western Railway वर 20 जूनपासून धावणार एसी लोकलच्या 40 फेऱ्या, पाहा वेळापत्रक
अग्निविरांसाठी संरक्षण मंत्रालयात 10 टक्के जागा राखीव ठेवणार; संरक्षण मंत्रालयाची घोषणा

रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार 20 जून पासून सोमवार ते शुक्रवार पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या 40 फेऱ्या धावतील, तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी एसी लोकलच्या 32 फेऱ्या धावतील. यामुळे प्रत्येक आठवड्यात पाच दिवस 40 प्रमाणे एसी लोकलच्या 200 फेऱ्या होतील तर इतर दोन दिवस 32 प्रमाणे एसी लोकलच्या 64 फेऱ्या होतील. यामुळे दर आठवड्याच्या एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या 264 होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकलच्या 56 फेऱ्या धावतात. एसी लोकलच्या तिकिटात 50 टक्क्यांची कपात झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. यामुळे पश्चिम रेल्वे एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर २० जूनपासून धावणार असलेल्या आठ अतिरिक्त एसी लोकलची माहिती

चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या जलद एसी लोकल

विरार ते दादर सकाळी ६.५७ वाजता

विरार ते चर्चगेट सकाळी ९.३४ वाजता

मालाड ते चर्चगेट संध्याकाळी ६.४४ वाजता

वसई ते चर्चगेट रात्री ८.४१ वाजता

विरारच्या दिशेने धावणाऱ्या फास्ट एसी लोकल

दादर ते विरार सकाळी ८.१८ वाजता

चर्चगेट ते मालाड सकाळी ११.०३ वाजता

चर्चगेट ते वसई रोड संध्याकाळी ७.०५ वाजता

चर्चगेट ते विरार रात्री ९.५७ वाजता

एसी लोकलच्या दरांमध्ये ५० टक्के कपात

५ किमी - आधी ६५ रुपये - आता ३० रुपये

२५ किमी - आधी १३५ रुपये - आता ६० रुपये

५० किमी - आधी २०५ रुपये - आता १०० रुपये

१०० किमी - आधी १९० रुपये - आता १४५ रुपये

१३० किमी - आधी ३७० रुपये - आता १८५ रुपये

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com