वडिलांना पाहून 14 महिन्यांची चिमुकली घराबाहेर पडली अन्...; नाशिकमधील धक्कादायक घटना

वडिलांना पाहून 14 महिन्यांची चिमुकली घराबाहेर पडली अन्...; नाशिकमधील धक्कादायक घटना

१४ महिन्याच्या चिमुरडीचा अपघाती मृत्यू; सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद
Published on

महेश महाले | नाशिक : कामाहून परतलेल्या पित्याला 14 महिन्यांच्या चिमुकलीने पाहिले. आनंदाच्या भरात भेटण्यासाठी चिमुकली घराबाहेर पडली अन् तोच क्षण तिच्यासाठी अंतिम ठरला. पिताच्या डोळ्यांदेखत १४ महिन्याच्या चिमुरडीचा अपघाती मृत्यू झाला. आणि बापाचे काळीज फाटल्यागत झाले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

वडिलांना पाहून 14 महिन्यांची चिमुकली घराबाहेर पडली अन्...; नाशिकमधील धक्कादायक घटना
अमरावतीत मविआचा फडणवीसांना धक्का! धीरज लिंगाडे विजयी

अमजद अखतार खान हे पंधरा दिवसांपूर्वी नाशिकमध्ये त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी नातलगांच्या घरी आले होते. आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी ते शहरातील एका खाजगी कंपनीत कामाला जात होते. बुधवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास कंपनीतून घरी आले असता, त्यांच्या १४ महिन्यांच्या चिमुकली म्हणजेच आयजा अमजद खान हिने त्यांना बघितले. वडिलांना बघितल्यानंतर ती आनंदाने त्यांच्याकडे घराबाहेर पडली.

याचवेळी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या हसनन मुजम्मिल खान हे त्यांचे चारचाकी वाहन घेऊन घराबाहेर निघाले असता, रस्ता ओलांडून वडिलांकडे जाणाऱ्या आयजाही त्यांच्या गाडीच्या पुढच्या चाकाखाली आली. हसन खान यांच्या लक्षात न आल्याने ते वाहन घेऊन निघून गेले. आयजा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघताच तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकाराबाबत वाहन चालक हसनेन खान यांच्या विरोधात वडील अमजद अखतार खान यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com