Banjara Samaj Protest
Banjara Samaj Protest

Banjara Samaj Protest : हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं; मागणी पूर्ण न झाल्यास आझाद मैदानावर धडकणार , बंजारा समाजाचा इशारा

हैदराबाद गॅझेटनुसारनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून बंजारा समाजाने सातत्याने आंदोलन केले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Banjara Samaj Protest) हैदराबाद गॅझेटनुसारनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून बंजारा समाजाने सातत्याने आंदोलन केले. या मागणीसाठी विविध ठिकाणी मोठे मोर्चे काढण्यात आले होते.

महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशन व नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचा कालावधी यासाठी दिला होता मात्र हा कालावधी संपूनही अद्याप निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर 18 जानेवारी रोजी संभाजीनगर येथील संत सेवालाल महाराज मंदिरात बंजारा समाजाची बैठक झाली.

या बैठकीत सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • बंजारा समाजाचा इशारा

  • 18 जानेवारी रोजी संभाजीनगर येथील संत सेवालाल महाराज मंदिरात बंजारा समाजाची बैठक झाली

  • ST आरक्षणावर निर्णय नाही तर आझाद मैदानावर मोठे आंदोलन

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com