विरारमध्ये जिम मालकावर अँसिड हल्ला

विरारमध्ये जिम मालकावर अँसिड हल्ला

Published by :
Published on

संदीप गायकवाड | विरारमध्ये जिम चालकावर अँसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयावरुन हा हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र फरार आहे.

विरारच्या फुलपाडा परिसरात स्विट बॉक्स फिटनेस या नावाची जिम आहे. रितेश कदम नामक व्यक्ती ही जीम चालवत होता. रितेश कदम बुधवारी मित्रासोबत मोटार सायकलवर येऊन, जिमच्या समोरील गल्लीमध्ये उभा होता. त्याचवेळी आरोपीने रितेशच्या अंगावर अँसिड टाकून पळ काढला. या हल्ल्यात रितेश कदम गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईच्या के.ए.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

दरम्यान या प्रकरणी तपासात प्राथमिक माहितीनुसार, विरारमध्ये पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयावरुन जिम मालकावर अँसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली.याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com