अभिनेते किरण माने मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला आले आहे. मालिकेतून काढून टाकल्याचा वाद एका टोकाला गेला आहे. किरण माने आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीला आले आहेत. तसेच सतिश राजवाडे सुध्दा जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीसाठी गेल्याचं समजतंय. विशेष म्हणजे सतीश राजवाडे हे स्टार प्रवाहाचे कंटेंट हेड आहेत. दरम्यान हे भेट कोणत्या कारणासाठी होत आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु होते. किरण माने यांच्या राजकीय पोस्टची बाजू जितेंद्र आव्हाडांनी घेतली होती.
दरम्यान आज किरण माने यांनी मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला आले आहे. परंतु किरण माने आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोणत्या कारणासाठी भेटले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. शिवसेनेचे खासदार अमोल कोल्हे यांनी आव्हाडांच्यासोबत बैठकीचं नियोजन केल्याने नेमकं काय होणार याकडे डोळे लागले आहेत.