Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली...
(Ladki Bahin Yojana ) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये 1500 इतकी रक्कम सन्मान निधी म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, जुलै महिना संपूनही त्या महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने लाभार्थींमध्ये अस्वस्थता होती.
आता यावर स्पष्टता देताना मंत्री आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी, म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हा हप्ता वितरित केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या निधीचे थेट लाभ हस्तांतरण लाभार्थींच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ! माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. अशी माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.