Uddhav Thackeray - Raj Thackeray : भाऊबीजेसाठी आदित्य आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावर येणार
थोडक्यात
आदित्य आणि तेजस ठाकरेंची शिवतीर्थावर भाऊबीज
उर्वशी ठाकरेंसोबत भाऊबीज करणार
यंदाची भाऊबीज शिवतीर्थावर साजरी होणार
(Uddhav Thackeray - Raj Thackeray) आज भाऊबीजेचा सण आहे. भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण आहे. मोठ्या उत्साहात हा सण सगळीकडे साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आता भाऊबीजेसाठी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावर येणार असल्याची माहिती मिळत आहे.
कालच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेले होते. राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सातत्याने गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी होताना पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक चर्चा देखिल रंगताना पाहायला मिळत आहेत.
आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळणार आहेत. एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच उर्वशी ठाकरेंसोबत ते भाऊबीज करणार आहेत. यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थावर साजरी होणार आहे. या भाऊबीजेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
