तब्बल 40 दिवसानंतर सत्याग्रही घाटातील महिलेच्या हत्येचा लावला छडा, पतीसह एकाला अटक
भूपेश बारंगे|वर्धा: नागपूर अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटामधील काही अंतरावर जंगलात 40 दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह मिळून आला होता.अश्या स्थितीत भीमराव रमेश शिंगारे यांना मृतदेह दिसताच त्यांनी तळेगांव पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आला होती.त्याच्या तक्रारवरून तळेगांव श्यामजीपंत पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर महिला अनोळखी असल्याने आरोपी शोधण्याचा पोलिसांसमोर आवाहन होते. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पोलीस यंत्रणा कामी लावून अखेर 40 दिवसांनी जोशना मनीष भोसले या महिलेचं मृतदेह असल्याचे निष्पन्न होताच हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
आरोपीला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच पथक तळेगांवात मुक्काम ठेवून त्यांच्याकडून वेळेवर माहिती घेऊन तपास सुरू ठेवण्यात आला होता. या घटनेची महिला बेपत्ता असल्याचे समजताच मृतक महिलेचे आईचा शोध घेऊन ओळख पटविण्यात आली. त्यानंतर मृतक महिला जोशना मनीष भोसले वय 32 हिची ओळख पटल्यानंतर मनीष भोसले यांनी त्याच्या मावस भाऊ प्रवीण पवार यांनी पत्नीचे अनैतिक संबंधाच्या संशयावरून हत्या करून तळेगांव पोलीस ठाण्याअंतर्गत सत्याग्रही घाटात महिलेचा मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेच मृतदेह पूर्णतः न जळाल्याने पायातील चप्पल साडी व बेन्ट्स दागिने घटनास्थळावर आढळून आले होते, यावरून पोलिसांनी प्रकरणाचा शोध लावला.
जवळपास या तपासात 50 पेक्षा जास्त पोलीस यंत्रणा कामी लावण्यात आली होती.पोलीस अधीक्षक नुरुल हसन ,अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, तळेगांव पोलीस निरीक्षक आशिष गजभिये , अमोल लगड, हुसेन शहा, पवन भांबुरकर , संतोष दरगुडे, निरंजन करने, गजानन लामसे, रणजित काकडे, अमोल ढोबाळे, रमेश पिस्कर, राजेश जयसिंगपुरे, गोपाल बावनकर,राकेश अष्टनकर, संघसेन कांबळे, अमोल मानमोडे, बालाजी मस्के गजानन दरने, दिनेश बोचकर, निलेश करडे, श्याम गावणेर, आशिष नेवारे यांनी कारवाई केली.
पोलिसांनी असा केला तपास
महिलेच्या चप्पल व तुकड्यावरून वर्धा, नागपूर शहर,ग्रामीण, अमरावती शहर, ग्रामीण,यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा, तसेच मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा, पांढरकवडा, मूलताई, आठणेर व बैतुल येथील अंदाजे 3 हजार बेपत्ता महिलेचा सोटोजन पोर्टलवरून शोध घेण्यात आला. मृतदेहजवळ मिळालेल्या साहित्य आधारे अनेक दागिने विक्रेते, कापड विक्रेते, ट्रेलर्स व चप्पल विक्रेत्याकडे शहानिशा केली.परिसरात गुरेढोरे चारणारे व जंगलातील लाकुडतोड , महामार्गावरील पेट्रोलपंप ,हॉटेल्स, पंक्चर दुरुस्ती करणारे, घटनास्थळी जवळून 25 ते 30 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले होते.
तांडा, बेड्यासह ऊसतोड महिलेचा तपास
तांडा व बेड्यासह ऊस तोड महिलेचा जवळपास बाराशे ते पंधराशे महिलेचा तपास करण्यात आला.यासोबत आशा वर्कर कडून दोन हजार महिलेची सायबर सेल कडून चौकशी करण्यात आली. या हत्येचा शोध घेणे पोलिसांसमोर आवाहन होते.मात्र वर्धा पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर तपास लावण्यात आला.
पोलीस अधीक्षकसह पोलिसांचे सर्वसामान्य कडून कौतुक
जिल्ह्यातील दोन हत्येप्रकरणी वर्धा पोलिसांनी छडा लावण्यात आला.कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी फाट्याजवळ अनोळखी इसमाचा हत्या करून मृतदेह फेकला होता. याप्रकरणी नऊ महिन्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तर सत्याग्रही घाटात अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला या प्रकरणाचा 40 दिवसानंतर छडा लावल्याने सर्वसामान्य नागरिक पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.