Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीनंतर एमआयएम आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar)महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील एमआयएम उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाराष्ट्रातील 19 महानगरपालिकांमध्ये मोठा विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून येत्या पाच तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एमआयएमकडून 12 ठिकाणी उमेदवार देण्यात येणार आहेत.
यासाठी पाच सदस्यांची निवड समिती स्थापन करण्यात आली असून उद्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीनंतर MIM आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही उतरणार
12 ठिकाणी उमेदवार उभे करणार
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी 5 सदस्यांची निवड समिती स्थापन
