मतदानानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या काटेवाडीतील निवासस्थानी दाखल

आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असताना सुप्रिया सुळे अजितदादांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. सुप्रिया सुळेंचे अजित पवार यांच्या घरी येण्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com