महाराष्ट्र
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा फोन
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना बाॅम्बने उडवण्यास त्याला दाऊद इब्राहिमच्या माणसाने सांगितल्याचा दावा केला आहे.
इतक्यावरच न थांबता आरोपीने माझे मेडिकल केले नाही तर मी जे जे रुग्णालयही बाॅम्बने उडवण्याची दिली धमकी आहे. या फोनचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फोनचा माघ काढत सायनच्या चुनाभट्टी परिसरात कामरान खान २९ या तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस अधिक तपास करत आहेत.