Bacchu Kadu
Bacchu Kadu

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Bacchu Kadu) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजपासून बच्चू कडू 7/12 कोरा यात्रा काढणार आहेत. ही यात्रा एकूण 7 दिवसांची 138 किलोमीटर पायी यात्रा असणार आहे.

या 7 दिवसांच्या पदयात्रेत बच्चू कडू हे गावागावात सभा घेणार असल्याची माहिती मिळत असून आज सकाळी 11 वाजता कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुखांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमीपासून ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावापर्यंत ही पत्रयात्रा असणार आहेत.

या सात दिवसांच्या पदयात्रेत बच्चू कडू शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून या 7/12 कोरा यात्रेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com