Ahilyadevi Holkar | ‘होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा’

Ahilyadevi Holkar | ‘होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा’

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद सुरु असतानाच आता तो वाद एका नव्या वळणाला गेला आहे. होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केला आहे.

संभाजीराजे छत्रपती जर उद्याच्या जेजुरी मधील कार्यक्रमाला जाणारच असतील तर त्यांनी अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करावं. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते जर अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण झले तर आम्ही त्याचे स्वागतच करू, असे होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटलं आहे. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भूषणसिंह होळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या आडून बहुजन समाजात दुही माजवण्याचे राजकारण सुरू असून आज (१३ फेब्रुवारी) पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे यांनी जाऊ नये, अशी पत्राद्वारे विनंती केली असल्याचे भूषण सिंह होळकर यांनी सांगलीमध्ये बोलताना सांगितले आहे.

तसेच या पुतळ्याचे अनावरण बहुजन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या हस्ते होऊ नये, या गोष्टीला आमचा विरोध असून छत्रपती संभाजी महाराज जर त्या कार्यक्रमाला जाणार असतील तर त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणे योग्य ठरेल, त्याला आमचा विरोध असणार नाही, पण होळकर घराण्याच्या संस्कृतीचा आणि ७०वर्षांपासून बहुजन समाजाचा राजकारणासाठी वापर केलेल्या व्यक्तीकडून अनावरण झाल्यास देशभरातील बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असेही भूषणसिंह होळकर यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे आज अनावरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर भूषण सिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com