AI Study in School
AI Study in School

AI Study in School : तिसरी पासूनच आता विद्यार्थ्यांना AI शिकवणार; केंद्र सरकारचा निर्णय

शैक्षणिक वर्ष 2026- 27 पासून विषय अभ्यासक्रमात
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • तिसरी पासूनच विद्यार्थ्यांना AI शिकवणार

  • AI बाबत केंद्र सरकारचा निर्णय

  • शैक्षणिक वर्ष 2026- 27 पासून विषय अभ्यासक्रमात

(AI Study in School) केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता तिसरीपासूनच विद्यार्थ्यांना एआय शिकवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

2026- 27 पासून हा विषय अभ्यासक्रमात घेण्यात येणार असून यासाठी देशभरातील एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन करण्यात आली आहे.

तिसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांपासूनच हा AI अभ्यासक्रम विकसित केला जाणार आहे. यासाठी आता वर्गनिहाय एआय अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com