अजय बारसकरांचा पुन्हा मनोज जरांगेंवर हल्लाबोल; म्हणाले...

अजय बारसकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

अजय बारसकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की, माझ्या मताशी अनेक मराठा बांधव सहमत आहेत. जे खरं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यावर केलेल्या आरोपांवर जरांगेंनी माफी मागावी. मला शिवीगाळ आणि जीवे मारण्याचा प्रयत्न. जरांगेंनी आरोप केले पण पुरावे दिले नाही. माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर जरांगेंनी दिलं नाही.

जरांगेंमुळे आज मराठा समाजाचा अपमान झाला. फडणवीसांची मराठा आरक्षणासाठी भेट घेतली. उपोषण करत असून दहा हत्तींचं बळ कसं? माझ्यावर खोटे आरोप केले. मनोज जरांगे काल चुकलेत. माझा आणि फडणवीसांचा काहीही संबंध नाही.

शिव्या दिल्यावर सरकार कुणबी दाखलं कसं देणार. पुराव्याशिवाय आम्ही बोलत नाही. उपोषण सुरु आहे मग जरांगेंना एवढी ताकद कशी आली? आरक्षणासाठी लढाई सुरु आहे मग राजकीय टीका का? माझ्या भूमिकेशी समाज सकारात्मक आहे. मी सत्य मांडत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com