Ajit Pawar vs Murlidhar Mohol
Ajit Pawar vs Murlidhar Mohol

Ajit Pawar vs Murlidhar Mohol : पुण्यात महायुतीच्या वादाचा नवा अंक; महाराष्ट्र ऑलिम्पिक निवडणुकीवरून भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीत खटके

महासचिवावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • पुण्यात महायुतीच्या वादाचा नवा अंक

  • महाराष्ट्र ऑलिम्पिक निवडणुकीवरून वाद

  • महासचिवावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ

(Ajit Pawar vs Murlidhar Mohol ) पुण्यात महायुतीच्या वादाचा नवा अंक आता पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक निवडणुकीवरून हा वाद असल्याची माहिती मिळत असून 2 नोव्हेंबर महाराष्ट्र ऑलिंपिक निवडणूक तोंडावर असताना महासचिवावर गुन्हा दाखल झाल्याने आता चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर निधीचा अपहार केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा महासचिव अजित पवारांच्या जवळचा असल्याची माहिती मिळत आहे.

या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा सामना होणार असून मुरलीधर मोहोळ अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा उभे राहत असून त्यांच्य विरोधात स्वत: अजित पवार उभे राहत आहेत. पुण्यातील राजकारण हे संपत नसल्याचेच पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com