Ajit Pawar - Supriya Sule : पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर दिसणार; संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Ajit Pawar - Supriya Sule) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. .येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. प्रचाराला जोरदार सुरूवात करण्यात आली असून पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळणार आहेत.
उद्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र येणार असून संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
