महाराष्ट्र
Ajit Pawar : अजित पवारांचा बीड दौरा ऐनवेळी रद्द; 181 विकास कामांचे भूमिपूजन लांबणीवर
अजित पवार आज बीड दौऱ्यावर येणार होते.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) अजित पवार आज बीड दौऱ्यावर येणार होते. अजित पवार यांच्या दौऱ्यात तब्बल 181 विकासकामांचे भूमीपूजन, सहकार भवनचे भूमिपूजन, टेनिस कोर्टचे उद्घाटन, मच्छिंद्रनाथ गड विकास आराखडा, औद्योगिक क्षेत्र, वन पर्यटन प्रकल्पांचे सादरीकरण आणि जिल्हा रस्ता सुरक्षेचा आढावा घेण्याचा कार्यक्रम यासोबतच 61 आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.
मात्र आता ऐनवेळी अजित पवार यांचा बीड दौरा झाला आहे. महापालिका निवडणुका आणि कॅबिनेट बैठकीमुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summery
अजित पवारांचा बीड दौरा ऐनवेळी रद्द
181 विकास कामांचे भूमिपूजन लांबणीवर.
महापालिका निवडणूक कॅबिनेट बैठकीमुळे दौरा रद्द
