NCP : अजित पवार मैदानात, सुप्रिया सुळे गायब?; पुण्यात राजकीय चर्चांना उधाण
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(NCP) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अजित पवार प्रचारासाठी अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र प्रचार सुरू होऊन आठवडा झाला मतदानाला अवघे आठ दिवस शिल्लक असताना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातील अद्याप मोठे नेते प्रचारात दिसत नाही आहेत. अजित पवार मैदानात उरल्याचे पाहायला मिळत असून सुप्रिया सुळे गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवारांच्या एकाही नेत्याकडून प्रचार करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जागावाटपासंदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खूपच कमी जागा मिळाल्या आहेत. यावरून नाराजी आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यामुळे आता पुण्यात राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
Summary
अजित पवार मैदानात, सुप्रिया सुळे गायब?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मात्र दुरावा कायम?
पुण्यात राजकीय चर्चांना उधाण
