Ajit Pawar : वेषांतराच्या आरोपांवर अजितदादांनी सरळ सांगितले, म्हणाले...

Ajit Pawar : वेषांतराच्या आरोपांवर अजितदादांनी सरळ सांगितले, म्हणाले...

उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेषांतर करून दिल्लीला गेल्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यावर अनेक आरोप करण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेषांतर करून दिल्लीला गेल्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यावर अनेक आरोप करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो. हे जे काही चाललं आहे. बदनामी करण्याचे काम आणि माझ्यासंदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम केलं. मी राज्याचा काही काळ खासदार राहिलो आहे, काही काल आमदार राहिलो आहे, राज्यमंत्री राहिलो आहे, विरोधीपक्षनेता राहिलो आहे, उपमुख्यमंत्री राहिलोय. मलाही जबाबदारी कळते. एखाद्याने स्वत:चे नाव बदलून जाणं हा गुन्हा आहे. त्याच्यासंदर्भात सगळीकडे सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. खुशाल काहीपण बडबडतात.

कोण बहुरुपी म्हणतेय, कोण अजून काही म्हणतंय. म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, वाटली पाहिजे. धादांत बिनबुडाचे आरोप हे माझ्यावर करत आहेत. याच्यामध्ये तसूभरदेखील तथ्य नाही. सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं. अरे काय केलं? उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला. त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला. अजित पवारांनी नाव बदललं. मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो, मला समाज ओळखतो. हे साफ चुकीचं आहे. त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईन. नाही सिद्ध झालं तर ज्या लोकांनी नौटंकी चालवली आहे ना त्यांना जनाची नाही मनाची वाटाला पाहिजे

यासोबतच ते पुढे म्हणाले की, मी महाराष्ट्राला सांगतो ही निव्वळ माझी बदनामी. मी लोकशाहीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मला जर कुठं जायचं म्हटले तर मी उथळ माथ्याने जाईन. मला लपूनछपून राजकारण करण्याची सवय नाही. आमचे जे विरोधक आहेत, ज्यांना आम्ही काम करतो ते बघवत नाही, ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतो ते बघवत नाही. ते पूर्णपणे फेक नेरेटिव्ह सेट करुन कायम त्याच्यामध्ये वेगळा प्रयत्न ते त्याठिकाणी करत असतात. ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल तर मी उघडपणे जाईन. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com