Ajit Pawar: 'मी भाजपवर नाही, महापालिकेवर बोललो' उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला असता, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी इशारा दिला आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत अजित पवार स्पष्ट करत म्हणाले, "पिंपरी-चिंचवड महापालिका आणि तिथल्या प्रश्नांवर मी भूमिका मांडली. केंद्र-राज्य सरकारबद्दल कोणताही मुद्दा नाही." यापूर्वी पिंपरीत पत्रकार परिषदेत त्यांनी "महापालिका लुटून खालली, लुटारूंना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो" असा आरोप केला होता.
चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, "अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर बोलत आहेत. आरोप-प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवावे. आम्ही आरोप केले तर त्यांना अडचण होईल, बोलताना काळजी घ्यावी." या वादाने महायुतीतील तणाव वाढला आहे.
माध्यमांनी पुन्हा विचारले तेव्हा अजित पवार म्हणाले, "आम्ही काँग्रेससोबत राज्य-केंद्रात १५ वर्षे सत्तेत होतो. पालिकेत एकमेकांविरोधात लढताना स्थानिक कारभारावर बोलायचो. आमच्या काळातील कामे आणि २०१७ नंतरची तुलना करू. पिंपरी-चिंचवडमध्ये २०१७ नंतर काय झाले ते सभांत मांडू." पवारांनी निवडणुकीवर फोकस ठेवत इतर मुद्दे टाळले.