Ajit Pawar On Ladki Bahin Yojana
AJIT PAWAR CLARIFIES ₹3000 LADKI BAHIN YOJANA PAYMENT AMID ELECTION ROW

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार का नाही? अजितदादांनी केला स्पष्ट खुलासा

Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेच्या ३,००० रुपयांच्या हप्त्यावरून सुरू असलेल्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्यावरून राजकीय तणाव वाढला आहे. येत्या १५ जानेवारीला एकूण २९ महापालिकांसाठी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील.

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'च्या हफ्त्यावर काँग्रेसचा आक्षेप, काँग्रेसच्या आक्षेपावर भाजपची चिडचिड

सध्या सभा आणि प्रचारांचा धुरळा उडाला असताना सत्ताधारी महायुती लाडकी बहीण योजनेच्या जोरावर महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मतदानाच्या एका दिवस आधी म्हणजे १४ जानेवारीला डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ अशा दोन महिन्यांचे ३,००० रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्याचा सरकारचा निर्णय नियमांच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाने केली खास घोषणा

काँग्रेससह विरोधी पक्षांनी या निर्णयावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आयोगाने दखल घेतली असून, आदर्श आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता असल्याने हप्ता लांबवण्याचे निर्देश देण्याची चर्चा आहे. या संभ्रमपूर्ण वातावरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढे येऊन स्पष्टता आणली आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्यास लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे ढकलू, असे ते म्हणाले. म्हणजेच आयोगाचा हस्तक्षेप न झाल्यास १४ जानेवारीला पात्र महिलांच्या खात्यात ३,००० रुपये जमा होतील आणि दुसऱ्याच दिवशी १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल.

या योजनेच्या हप्त्यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असताना अजित पवारांच्या या वक्तव्याने लाडक्या बहिणींमधील संभ्रम काहीसा दूर झाला आहे. तरीही आता राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा निर्णय केवळ महिलांच्या खात्यातील रक्कमच नव्हे, तर निवडणुकीच्या रिंगणातील समीकरणांनाही प्रभावित करू शकतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com