महाराष्ट्र
भल्या सकाळी काम सुरू करायची सवय पवारसाहेबांमुळेच – अजित पवार
आम्हां बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरू करायची सवय पवारसाहेबांमुळे लागली, असे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले. आता अनेकजण त्यामुळं थोडं दबकतात, की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही, असं म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
याशिवाय 'मुद्दाम कुणाला तरी त्रास द्यायची भूमिका नसते, असे स्पष्ट करत त्यांनी लवकर उठण्याच्या सवयीवर भाष्य केलं. लवकर काम सुरू केलं की, इतर कामांनाही वेळ देता येतो, असंही त्यांनी सांगितलं.