Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार येऊनही बारामती हॉस्टेलला कुलूप, PA वर भडकले

अजित पवार सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची आज बैठक घेणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Ajit Pawar ) महापालिका निवडणुकांचा 16 जानेवारीला निकाल लागला. त्यानंतर आता अनेक पक्षाच्या अनेक बैठका होताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची आज बैठक घेणार आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसोबत अजित पवार आज संवाद साधणार आहेत. दोन्ही शहरातील नगरसेवकांसोबत अजित पवार बैठक घेत सूचना देणार असल्याची माहिती मिळत आहे.

बारामती हॉस्टेलमध्ये ही बैठक होणार असून अजित पवार नगरसेवकांना कोणता कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचे आहे. अजित पवार यांचे 27 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार PA वर चिडल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार बारामती हॉस्टेल येथे पोहोचले मात्र बारामती हॉस्टल बंद असल्याने अजित पवार काही वेळ उभे राहिले आणि PA वर भडकल्याचे पाहायला मिळत आहे.

Summary

  • अजित पवार PA वर चिडले

  • अजित पवार बारामती हॉस्टेल येथे पोहोचले

  • अजित पवार आल्यानंतरही बारामती हॉस्टल बंद असल्याने अजित पवार काही वेळ उभे राहिले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com