NCP : अजित पवार , रोहित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये रात्री उशीरा जिजाई बंगल्यावर खलबतं
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(NCP ) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक बैठका होताना पाहायला मिळत आहे. यातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीची रात्री उशिरा गुप्त बैठक पार पडल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार बैठकीला हजर होते.
शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी अजितदादांची भेट घेतली. त्याआधी या दोन्ही नेत्यांमध्ये आणि दादांच्या पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यामध्ये तासभर चर्चा सुरु झाली. त्यामुळे आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला सुरूवात
अजित पवार , रोहित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये रात्री उशीरा
जिजाई बंगल्यावर खलबतं
