Ajit Pawar : "यंदा कर्जमाफी..."; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अजित पवार म्हणाले...
थोडक्यात
राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया
"पुढच्या अर्थसंकल्पात पीक कर्जासाठी कर्जमाफी दिली जाईल"
( Ajit Pawar ) राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांकडून मदतीची, कर्जमाफीची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वक्तव्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, "मी अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर केला आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती कर्जमाफी पीक कर्जाच्याकरता आम्ही देणार आहे. त्यामुळे काळजी करु नका."
"परंतु यावर्षी देता येत नाही. ती 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पुढच्या अर्थसंकल्पात पीक कर्जासाठी कर्जमाफी दिली जाईल." असे अजित पवार म्हणाले,
