आणि अजितदादांनी आंदोलनाला लावलेल्या हजेरीने कार्यकर्त्यांची मने जिंकली…
अमोल धर्माधिकारी, पुणे | सध्या राजकीय वातावरणात पवार कुटूंबीय पुन्हा एकदा चर्चेत आलंय… या आधी जेव्हा शरद पवार यांना ED ची नोटीस आली तेव्हा राष्ट्रवादी जशी आक्रमक झाली तशीच आज ही अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांपासून ते आमदार सगळे अजित पवारांना पाठींबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
पुण्यातील विधान भवनात अजित पवारांची बैठक असल्याने राष्ट्रवादीने गेटवरच दादांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला… दादा भेटतील अशी सर्वांना उत्सुकता होती,मात्र दादा दुसऱ्या गेटने विधानभवनात गेले…त्यानंतरही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अजित पवारांना जोरदार पाठींबा दिला… आणि मग कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दादा आंदोलन स्थळी पोहोचले… यावेळी समर्थकांकडून होणारी जोरदार घोषणा ऐकून दादा ही भारावले…
पाच मिनिटांच्या कालावधीत अजित पवारांनी तीन वेळा कार्यकर्त्यांना हात जोडून अभिवादन केले… आणि तुम्ही परत जावा अस आवाहन केलं…मात्र यानिमित्ताने जशी शरद पवारांच्या त्या घटनेत सहानुभूती पाहायला मिळाली तशीच परिस्थिती आजही प्रत्येक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली.