महाराष्ट्र
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या दरम्यान ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर हे संमेलन होणार आहे.
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७ दशकांनी दिल्लीत होत असून शरद पवार साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता फेब्रुवारीमध्ये दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक सावरकरप्रेमींनी साहित्य महामंडळ व आयोजकांकडे केली होती.
या मागणीची दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.