अमरावती-अकोला मार्गाचा होणार जागतिक विक्रम, चार दिवसांत 75 किमी मार्ग
admin

अमरावती-अकोला मार्गाचा होणार जागतिक विक्रम, चार दिवसांत 75 किमी मार्ग

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ कि.मी. महामार्ग निर्मितीच्या कामाला सुरुवात
Published by :
Team Lokshahi

अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजुच्या दोन लेनमधील ७५ कि.मी.पर्यंतचे चौपदरीकरणाचे काम चार दिवसांत करण्यात येणार आहे. राज पथ इन्फ्रा. या कंत्राटदार कंपनीने हे काम घेतले आहे. या रस्त्याच्या कामाला शुक्रवारी सकाळपासून युद्ध स्तरावर सुरूवात झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते मूर्तीजापूरपर्यंत एका बाजुच्या दोन लेनमधील ७५ कि.मी.पर्यंतचे चौपदरीकरणाचे काम चार दिवसांत करण्याचे नियोजन राज पथ इन्फ्रा. या कंत्राटदार कंपनीने केले. निसर्गाची साथ लाभून हा प्रयत्न यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होण्याची शक्यता आहे. लोणीजवळ विधिवत पूजा करून या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी मनुष्यबळ व मोठ्या मशिनरी लावण्यात आल्या असून २४ तास हे काम चालणार आहे

  • राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते नवापूरपर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामाला २०१३ मध्ये मंजुरी मिळाली

  •  ४८०.७९ कि.मी. लांबीच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची अमरावती ते चिखली (नांदुरा अगोदरचे गाव) १९४ कि.मी. आणि फागणे ते नवापूर १४०.७९ कि.मी. अशी कामाची विभागणी

  • लोणी-मूर्तीजापूर दरम्यान विक्रम रचण्याचा प्रयत्न ७२८ मनुष्यबळ कार्यरत राहणार

  • सलग 24 तास राहणार काम सुरू

अमरावती-अकोला मार्गाचा होणार जागतिक विक्रम, चार दिवसांत 75 किमी मार्ग
Rajya Sabha Elections : महाविकास आघाडी अन् भाजपने एकमेकांना दिला असा प्रस्ताव
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com