Amravati
Amravati

Amravati : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कलोती चिखलदरा नगरपरिषदेत बिनविरोध

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषद मध्ये भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Amravati) अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषद मध्ये भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कलोती यांनी प्रभाग क्रमांक दहा मधून नगरसेवकसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

मात्र त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेस सह इतर 9 पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अल्लाह कलोती हे बिनविरोध नगरसेवकपदी निवडून आले.

यावेळी आमदार रवी राणा यांनी स्वतः उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना फोन लावून अल्लाद कलोती यांचं फोनवरून अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. अमरावती जिल्ह्यात पहिला नगरसेवक हा भाजपचा बिनविरोध विजय झाला आहे.

Summery

  • अल्लाद कलोती चिखलदरा नगरपरिषदेत बिनविरोध

  • अल्लाद कलोती फडणवीस यांचे मामेभाऊ

  • चिखलदरा नगरपरिषद मधून बिनविरोध नगरसेवकपदी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com