CIDCO Tender Scam Allegations Shake Navi Mumbai EduCity Project
CIDCO Tender Scam

CIDCO: सिडकोच्या टेंडर घोटाळा प्रकरण; सिडको प्रशासन माहिती लपविण्याच्या तयारीत?

CIDCO Tender Scam: सिडकोच्या आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्पासाठी काढलेली दोन टेंडर अचानक रद्द झाल्याने घोटाळ्याचे आरोप वाढले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

सिडकोमध्ये टेंडर घोटाळ्याचा आरोप घोंगावत असून, ठराविक कंत्राटदारांना खुश करण्यासाठी नियम मोडले गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. सिडकोने नवी मुंबईतील विमानतळाजवळील कुंदे वहाळ येथे सेंटर ऑफ एक्सलेंस अंतर्गत आंतरराष्ट्रीय एज्युसिटी भाग एक आणि भाग दोनच्या विकासासाठी ऑक्टोबर २०२५ मध्ये टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. कंपन्यांनी आपल्या बिदी सादर केल्यानंतर मात्र अचानक दोन्ही टेंडर रद्द करण्यात आली.

CIDCO Tender Scam Allegations Shake Navi Mumbai EduCity Project
Traffic Challan: रोख रकमेचा झंझट संपला! दिल्लीमध्ये UPIवरून थेट चलन भरण्याची सुविधा

टेंडर प्रक्रियेत संशयास्पद वळण

सिडकोने सुरू केलेल्या या महत्त्वाच्या टेंडर प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभागी होऊन आपल्या बोली सादर केल्या होत्या. टेंडर भरण्याची मुदत संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रशासकीय कारणास्तव असा उल्लेख करून हे दोन्ही टेंडर रद्द करण्याचा आदेश जारी करण्यात आला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नाराजी व्याप्त झाली असून, यामागे काही तरी गुप्त हेतू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

CIDCO Tender Scam Allegations Shake Navi Mumbai EduCity Project
Bharat Taxi: ड्रायव्हर्सची कमाई अन् प्रवाशांचा खर्च कमी; 'या' दिवसापासून सुरु होणार भारत टॅक्सी

सिडको प्रशासनाकडून मौन

या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. सिडको प्रशासनाने टेंडर रद्द करण्यामागील नेमके कारण स्पष्ट केलेले नाही, ज्यामुळे या प्रकरणात काही लपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विमानतळाजवळील या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या विकासात होणारा विलंब आणि टेंडर रद्दीकरणामुळे नवी मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा

या घोटाळ्याच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. ठराविक कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगितले जात असून, याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वाढत आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाकडून लवकरच स्पष्टीकरण येण्याची अपेक्षा आहे.

Summary
  • सिडकोने एज्युसिटी प्रकल्पासाठीची दोन्ही टेंडर अचानक रद्द केली

  • टेंडर प्रक्रियेत नियमभंग झाल्याचा आरोप

  • सिडको प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण नाही

  • प्रकरणाची चौकशी करण्याची राजकीय मागणी वाढली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com