Ambadas Danve
Ambadas Danve

Ambadas Danve : सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून...; अंबादास दानवेंचा फडणवीस, शिंदेंना टोला

एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

  • अंबादास दानवेंचा फडणवीस, शिंदेंना टोला

  • 'सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद'

(Ambadas Danve) एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' योजना बंद होण्याची चर्चा रंगली असून मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या आनंदाच्या शिधा या योजनेनंतर आता माझी शाळा सुंदर शाळा ही योजना बंद करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,'सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील'

शिंदेंच्या या योजना बंद..

१. आनंदाचा शिधा- बंद!

२. माझी सुंदर शाळा - बंद!

३. १ रुपयात पीकविमा - बंद!

४. स्वच्छता मॉनिटर - बंद!

५. १ राज्य १ गणवेश - बंद!

६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप - बंद!

७. योजनादूत योजना - बंद!

८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना - बंद!

'योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू.' असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com